रेल्वे स्टेशन परिसरात मटका जुगारावर पोलिसांचा छापा,1 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त
उदगीर: शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात अवैध मटका जुगारावर शहर पोलिसांनी छापा टाकून 1 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उदगीर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात अवैध मटका जुगार चालू असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली होती, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उदगीर शहर पोलिसांनी 29 नोव्हेंबर रोजी छापा टाकला असता आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार खेळवीत असताना शहर पोलिसांनी छापा टाकून जुगाराच्या साहित्यासह 1 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे.अशी फिर्यादपोलीस कॉन्स्टेबल सतीश भानुदास पवार यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिल्यावरुन आरोपी किशोर धोंडीराम धनवाले यांच्यावर गुरंन 326/23 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चव्हाण हे करीत आहेत.
0 Comments