ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत लग्नाचे आमिष दाखवून महिलेचा विनयभंग,ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उदगीर:ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून विनयभंग केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत एका 30 वर्षीय महिलेला आरोपी अतिष चंद्रकांत सोमवंशी यांनी फिर्यादी महिलेला जवळीकता साधून फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून दिनांक 18/6/2021 ते 29/11/23 पर्यंत आरोपींने सतत वारंवार शारीरिक संबंध ठेवला,फिर्यादी महिलेने आरोपीस लग्न करण्याची विनंती केली असता माझे पूर्वीच लग्न झाले असून मी तुझ्या सोबत लग्न करू शकत नाही म्हणून फिर्यादी महिलेला घरातून हाकलून देऊन जीवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद पिडीत महिलेंनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी अतिष चंद्रकांत सोमवंशी यांच्यावर गुरंन 660/23 कलम 376,376(2)(n) 506 भादवी प्रमाणे 29 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी.एम.देवकत्ते हे करीत आहेत.
0 Comments