डीपीची लाईट बंद का केली म्हणून विचारणा केली असता वस्तऱ्याने केली मारहाण
उदगीर:शहरातील गवंडी गल्ली येथे डीपीची लाईट बंद का केली म्हणून विचारणा केली असता एकास घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिसांत एकविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की.उदगीर शहरातील चौबारा गवंडी गल्ली येथील फिर्यादी इरफाना जमिरोद्दीन शेख यांच्या मुलाने आरोपींस डीपीची लाईट बंद का केली म्हणून विचारणा केली असता.आरोपीने फिर्यादीच्या मुलास वस्तऱ्याने मारून जखमी केले.व लहान मुलांचे मोबाइल फोडून सहा हजार रुपयांचे नुकसान केले.व तुझा मोठा मुलगा जैद कोठे आहे असे म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.इरफाना जमीरोद्दीन शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अरफात शेख यांच्यावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुरंन 328/23 कलम 324,452,427,323,504,506 आयपीसी प्रमाणे 30 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या आदेशाने पोलीस हेडकॉन्स्टेबल गोलंदाज हे करीत आहेत.
0 Comments