*मराठा विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहासाठी 172.87 कोटी रुपये मंजूर : क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे*
शहरांमध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी सारथी या संस्थेमार्फत भव्य दिव्य सर्व सोई सुविधा युक्त वस्तीगृह उभारण्यात येणार
लातूर : लातूर हे मराठवाड्यातील शैक्षणिक हब असून शिक्षणासाठी येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असते येथे येणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांसाठी भव्य दिव्य व सर्व सोयी सुविधा यांनी उपयुक्त असे सारथी या संस्थेच्या मार्फत वस्तीग्रह उभारण्यात येणार असून यासाठी शासनाने 172.87 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला महाराष्ट्र शासनाच्या सारथी संस्थेमार्फत याची निर्मिती करण्यात येणार आहे . शिक्षणासाठी येणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची यामुळे सोय होणार आहे अशी माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
राज्य शासनाने बार्टीच्या धर्तीवर सारथी या संस्थेची निर्मिती केली असून या संस्थेमार्फत मराठा विद्यार्थ्यांना विविध सोयी सवलती उपलब्ध करून देण्यात येत असतात याचाच एक भाग म्हणून लातूर येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असल्यामुळे व मराठवाड्यातील तसेच राज्यातील शैक्षणिक हब म्हणून ओळखले जात असल्यामुळे या ठिकाणी मराठा वस्तीगृहाची मागणी करण्यात येत होती या मागणीला शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत सुमारे 172.87 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून लवकरच ही इमारत उभारण्यात येणार असून यामुळे जिल्ह्यातील व जिल्ह्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व राज्याचे दोन्ही कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजित दादा पवार यांचे हे वसतिगृह मंजूर करून दिल्याबद्दल राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी आभार मानले असून ही इमारत लवकरच उभारण्यात येईल अशी माहिती ना. बनसोडे यांनी दिली आहे.
0 Comments