*क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा*
लातूर, दि. 25 राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे 26 नोव्हेंबर 2023 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
ना. बनसोडे यांचे 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता लातूर विमानतळ येथे आगमन होईल व मोटारीने उदगीर तालुक्यातील वाढवणा खु. कडे प्रयाण करतील. वाढवणा खु. येथील अडोळवाडी कॉर्नर येथे त्यांच्या उपस्थितीत दुपारी 12.30 वाजता आधिराज पोल इंडस्ट्रीजचे उद्घाटन होईल. दुपारी 2.30 वाजता वाढवणा खु. येथील दिवंगत अण्णाराव दिगंबरराव पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. दुपारी 3 वाजता वाढवणा खु. येथील विकास मुसणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील.
ना. बनसोडे यांच्या उपस्थितीत दुपारी 4.45 वाजता उदगीर तालुक्यातील लिंबगाव येथे मृद व जलसंधारण विभागामार्फत नवनिर्मित को. प. बंधाऱ्यात निर्माण झालेल्या प्रथम हंगामातील जलसाठ्याचे जलपूजन होईल. सायंकाळी 6 वाजता ते चांदेगाव येथील दिवंगत कुशाबाई सोपानराव मुसणे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सायंकाळी 7 वाजता उदगीर रेल्वे स्टेशन समोरील गोपाळ नगर येथे अजय सावंत यांच्या मुलीच्या वाढदिवस सोहळ्यास उपस्थित राहतील. त्यानंतर सोयीनुसार मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील. लातूर येथील शकुंतला निवासस्थान येथे आगमन व मुक्काम करतील.
0 Comments