Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

संविधान दिनानिमित्त समाज कल्याण विभागामार्फत लातूर येथे रॅलीच्या माध्यमातून जनजागृती

संविधान दिनानिमित्त समाज कल्याण विभागामार्फत लातूर येथे रॅलीच्या माध्यमातून जनजागृती

लातूर, दि. 25 : संविधान दिनानिमित्त समाज कल्याण विभागामार्फत संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली.
समाज कल्याण सहायक आयुक्त एस. एन. चिकुर्ते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यावेळी उपस्थित होते.
रॅलीमध्ये समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, लातूर जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समिती, जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, तसेच शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला. 
तत्पूर्वी संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे मान्यवरांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, गृहपाल, विद्यार्थी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात