Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

सासुरवाडीत रुबाब दाखवणाऱ्या जावयाला ठोकून दिला महाप्रसाद,पत्नीसह चौघांवर गुन्हे दाखल

सासुरवाडीत रुबाब दाखवणाऱ्या जावयाला ठोकून दिला महाप्रसाद,पत्नीसह चौघांवर गुन्हे दाखल

उदगीर:सासुरवाडीत आलेल्या जावयाने पत्नीला मला पोहे का करून दिली नाही म्हणून रुबाब दाखवताच पत्नीसह चौघांनी जावयास चांगलेच धुतल्याची घटना घडली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की देवणी तालुक्यातील दवणहिप्परगा येथील रहिवासी असलेले जावई आकाश बाबूराव पाटील हा उदगीर तालुक्यातील महादेववाडी येथे पत्नीला भेटण्यासाठी सासुरवाडी येथे आला होता,यावेळी पत्नीने त्याच्या पाहुणचारासाठी पोहे बनवले होते.परंतु तू मला पोहेच कस काय बनवलीस,असे म्हणत जावयाने सासुरवाडीत वाद घालण्यास सुरुवात केली.त्याचा रुबाब बघून पत्नी पार्वती आकाश पाटील,पंडित रामदास बामणे,रामदास बसवंत बामणे,प्रभावती रामदास बामणे सर्व राहणार महादेववाडी ता. उदगीर यांनी संगनमत करून शिवीगाळ केली व लाथाबुक्याने मारहाण करून लोखंडी रॉडने व वेळूच्या काठीने डोक्यात व हातावर मारहाण करून गंभीर जखमी केले.व जीवे मारण्याची धमकी दिली.अशी फिर्याद आकाश बाबुराव पाटील यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून चौघांवर गुरंन 652/23 कलम 326,323,504,506,34,भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तारू हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात