भारतीय संविधान दिनानिमित्त भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने अभिवादन
उदगीर - दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला महान संविधान समर्पित केले होते. जगातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे महत्त्व अधोरेखित करणारा संविधान दिनानिमित्त भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदगीर येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आले . या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उदगीर शहराध्यक्ष समीर शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभगाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव आंबेगांवे, माजी उपसभापती धनाजी जाधव, प्रा दशरथ शिंदे, राकाँपा सांस्कृतिक विभागाचे लातूर जिल्हाध्यक्ष अभिजीत औटे, राकाँपा अल्पसंख्यांक विभागाचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष शफी हाशमी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संघशक्ती बलांडे, नूरखॉ पठाण , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभगाचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रदीप जोंधळे, उदगीर तालुकाध्यक्ष अरविंद गिलचे, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर तिकटे, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
0 Comments