लोहा पोलिसांची सर्जिकल स्ट्राईक आठ ठिकाणी छापे टाकून लाखोंचा गुटखा केला जप्त
नांदेड:जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार लोहा यांच्या सूचनेनुसार लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओंमाकांत चिंचोलकर यांनी एकाच दिवसात लोहा शहरात आठ ठिकाणी छापे टाकून लाखोंचा गुटखा जप्त करून आठ लोकांना ताब्यात घेतले आहे. लोहा शहरात अनेक ठिकाणी पोलिसांच्या नजरा चुकवून महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंध असलेला गुटखा व पानमसाला विक्री करणाऱ्यावर छापेमारी केली.यापुढे लोहा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कोणी अवैध धंदे करण्याचा प्रयत्न केला तर त्याची कसल्याच प्रकारची गय केली जाणार नाही असा इशारा लोहा पोलिसांनी दिला आहे.आठ ठिकाणी केलेल्या कारवाईत आठ जणांना ताब्यात घेतले असून लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
0 Comments