अनोळखी व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू,शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
उदगीर:येथील महादेव मंदिर तेलघाणे हॉस्पिटल जवळ अंदाचे एक 40 वर्ष वयाचा अनोळखी पुरुष 26 नोव्हेंबर रोजी रोडच्या कडेला पडलेला होता.याची माहिती मिळताच रोटी कपडा बँकचे कर्मचाऱ्यांनी त्यास उपचारासाठी उदगीर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. सदरील व्यक्तीवर उपचार सुरू असताना 27 नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.अशी माहिती डॉ चोले यांनी उदगीर शहर पोलिसांत दिल्यावरून उदगीर शहर पोलिसांत अकस्मात मृत्यू नंबर 27/23 कलम 174 सीआरपीसी प्रमाणे 27 नोव्हेंबर रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.त्याचा वर्णन केस काळे पांढरे,चेहरा गोल लांबट, रंग सावळा,नाक सरळ,दाढी मिश्या काळी पांढरी,उंची पाच फूट पाच इंच,अंगात चॉकलेटी रंगाचा टी शर्ट आडव्या रेघा असलेला व टी शर्टच्या आतून हिरवट शर्ट ज्यात पांढरी रेघा असलेला व चॉकलेटी रंगाची पॅन्ट वैगरे वर्णनाचा अनोळखी इसमाचा मृतदेह ओळख पटवण्यासाठी शासकीय रुग्णालयातील शीतगृहात ठेवण्यात आला आहे या वर्णनाच्या व्यक्तीस कोणी ओळखत असल्यास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या मोबाईल 8693828777 व 9823591469 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पुट्टेवाड हे करीत आहेत.
0 Comments