बस्थानका समोरून एकाचे अपहरण, अज्ञातावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल
उदगीर:बस्थानका समोरून एका 34 वर्षीय व्यक्तीचा अपहरण झाल्याची घटना 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:45 वाजता घडली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उदगीर बस्थानका समोर मणियार न्युज पेपर एजन्सी जवळ धर्मराज नारायण गिरी वय 34 वर्ष राहणार समतानगर उदगीर या व्यक्तीचा दोन अनोळखी आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या मुलास अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे अशी तक्रार शांताबाई नारायण गिरी यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिल्यावरून अज्ञातावर गुरंन 325/23 कलम 365,34 भादवी प्रमाणे 26 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव मॅडम हे करीत आहेत
0 Comments