*क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा*
लातूर, दि. 29 : राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे शनिवार, 30 डिसेंबर 2023 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांचे 30 डिसेंबर रोजी सकाळी 11.10 वाजता हेलिकॉप्टरने उदगीर येथे आगमन होईल व उदगीर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. सकाळी 11.30 वाजता उदगीर शहरातील नळेगाव रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण समारंभास ते उपस्थित राहतील. सकाळी 11.45 वाजता उदगीर तालुक्यातील मलकापूर येथील रिंग रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिजच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 12.10 वाजता उदगीर येथील नूतन शासकीय विश्रामगृहाच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित राहतील.
ना. बनसोडे यांच्या उपस्थितीत दुपारी 12.30 वाजता उदगीर येथील कौळखेड रोडवरील दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन होईल. दुपारी 1.15 वाजता माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. दुपारी 1.30 वाजता उदगीर शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सायंकाळी 5 वाजता उदगीर शहरातील उमा चौक येथे श्री उदयगिरी जेनेरिक मेडिकलच्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहतील. सायंकाळी 6 वाजता उदगीर तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित राज्यस्तरीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहतील. सोयीनुसार उदगीर येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील.
*****
0 Comments