Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा लातूर जिल्हा दौरा*

*सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा लातूर जिल्हा दौरा*

लातूर, दि. 29: राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण हे शनिवार, 30 डिसेंबर 2023 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चव्हाण यांचे 30 डिसेंबर रोजी सकाळी 11.10 वाजता हेलिकॉप्टरने उदगीर येथे आगमन होईल व उदगीर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. सकाळी 11.30 वाजता उदगीर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयाच्या उद्घाटन समारंभास ते उपस्थित राहतील. सकाळी 11.45 वाजता उदगीर तालुक्यातील मलकापूर येथील रेल्वे ओव्हर ब्रिजच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 12.10 वाजता उदगीर येथील नूतन शासकीय विश्रामगृहाच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित राहतील. 
ना. चव्हाण यांच्या उपस्थितीत दुपारी 12.30 वाजता उदगीर येथील दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन होईल. दुपारी 1.15 वाजता माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. दुपारी 1.30 वाजता उदगीर शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 2.15 वाजता माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. दुपारी 2.30 वाजता हेलिकॉप्टरने पुणे जिल्ह्यातील जुन्नरकडे प्रयाण करतील.
******

Post a Comment

0 Comments

जाहिरात