Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

तीन राज्यातील विजयाबद्दल उदगीर भाजपच्या वतीने जल्लोष

तीन राज्यातील विजयाबद्दल उदगीर भाजपच्या वतीने जल्लोष

उदगीर : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळल्याबद्दल उदगीर शहर भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष साजरा करण्यात आला.
             देशातील चार राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यात भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. या विजयाचा जल्लोष करण्यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात बँडबाजा व फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, जि. प. चे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवशंकर धुपे मनोहर भंडे, नंदकुमार नळंदवार, प्रा. पंडित सूर्यवंशी, बस्वराज रोडगे, धर्मपाल नादरगे, बालाजी गवारे, बापूराव यलमटे, गणेश गायकवाड, उदयसिंग ठाकूर, आनंद बुंदे , लखन कांबळे, सावन पस्तपुरे, नामदेव आपटे, आनंद साबणे, वसंत शिरशे, सतीश उस्तुरे, डॉ चंद्रकांत कोठारे,सुजित जीवने , संजय पाटील, अमीर शेख, पप्पू गायकवाड,मोतीलाल डॉइजोडे, सत्यवान बोरोळकर, रामेश्वर पवार, मारुती श्रीनिवार, सुनील गुडमेवार, संजय पांढरे, व्यंकट काकरे, स्वरूप महिंद्रकर, दत्ता केंद्रे, रमेश धावडे, महेश धावारे, अनिकेत गुडमेवार, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शिल्पा इंगळे, रमाबाई वाघमारे, मंदाकिनी जीवने, वर्षाराणी धावारे, रेणुका डुबुकवाड, कृपा सूर्यवंशी, अनिता बिरादार ,स्वाती वट्टमवार, कांताताई सूर्यवंशी , भारती सूर्यवंशी, शिवगंगा बिरादार ,मीनाक्षी भोसले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात