Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा उदगीर येथे शुभारंभ*

*राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा उदगीर येथे शुभारंभ*

▪️ *राज्यातील नऊ विभागातून ३०६ खेळाडू, १८ संघव्यवस्थापक, २० तांत्रिक अधिकारी सहभागी*

लातूर दि. 3 उदगीर येथे राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेची सुरुवात झाली असून त्याचे उदघाटन उपविभागीय अधिकारी श्री. सुशांत शिंदे यांनी आज येथे केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांच्यावतीने तालुका क्रीडा संकुल, मेन रोड, उदगीर येथे दि. ०२ ते ०५ डिसेंबर, २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.
   उद्घाटन प्रसंगी राज्यातून विविध विभागांमधून आलेल्या खेळाडूंनी विभागाचे ध्वज घेऊन संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली. 
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदगीरचे तहसिलदार श्री. रामेश्वरजी गोरे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी श्री. प्रवीण सुरडकर, महाराष्ट्र फुटबॉल असोसिएशनचे कोषाध्यक्ष श्री. सलीम परकोटे, माजी नगरसेवक फैयाझ शेख, माजी नगरसेवक तथा जिल्हा फुटबॉल असोसिएशन चे उपाध्यक्ष अहमद सरवर, तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड, श्रीमती सारिका काळे, क्रीडा अधिकारी मदन गायकवाड, क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे, राज्यक्रीडा मार्गदर्शक जयराज मुंढे, चंद्रकांत लोदगेकर, निवड समितीचे सदस्य श्री. सुमीत पाटील, श्री. किरण दुस्तगीर, श्री. राजेश कांबळे, जयहिंद पब्लिक स्कुलचे प्राचार्य, श्री. संजय हट्टे, पंच म्हणून श्री. वसीम बेग, सलीम शेख, श्री. अजीज खान, श्री. शेख निजाम, इफ्तेखार शेख, अमर मगर, अभिजीत मोरे, बालाजी तेलंगे, आदि मान्यवर उपस्थित होते.
   उदगीर शहर हे शैक्षणिक गुणवत्तेसाठी राज्यात अग्रेसर आहे, तथापि आता उदगीरमध्ये विविध खेळांच्या पायाभूत सुविधा निर्माण होत असल्याने आता दर्जेदार खेळाडू तयार करणारे शहर म्हणून नावलौकीक मिळवेल यात शंका नाही असे सांगुन उपविभागीय अधिकारी श्री. सुशांत शिंदे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या वेळी उदगीरचे तहसिलदार श्री. रामेश्वर गोरे, जिल्हा फुटबॉल असोसिएशन तर्फे श्री परवेझ कादरी यांनीही मनोगत व्यक्त करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी श्री जगन्नाथ लकडे यांनी केले. यावेळी त्यांनी प्रस्ताविकात उदगीर शहरात क्रीडा संस्कृती रुजावी म्हणून क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. संजय बनसोडे 
यांचे प्रयत्न आहेत. त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून या राज्यस्तरीय स्पर्धा येथे आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. या स्पर्धेला उदगीरकरांनी राज्यातील विविध विभागातील आलेल्या खेळाडूंचा उत्साह वाढवून प्रात्साहन द्यावे असे आवाहन केले.  राज्याच्या विविध भागातून आलेल्या या क्रीडापटुंची निवास व्यवस्था जयहिंद पब्लीक स्कुल, उदगीर, आणि मुलींची निवास व्यवस्था शिवाजी महाविद्यालय, उदगीर यांचे वसतीगृह आणि पंचांची निवास व्यवस्था धन्वंतरी महाविद्यालय, उदगीर येथे करण्यात आली असल्याचे सांगितले.  मुलींच्या फुटबॉल स्पर्धेसाठी उदयगिरी महाविद्यालयाचे मैदान उपलब्ध करून दिल्या बद्दल अध्यक्ष व सचिव यांचे आभारही त्यांनी मानले.
     या स्पर्धेमध्ये राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, लातुर, मुंबई, पुणे, क्रीडा प्रबोधिनी, पुणे व कोल्हापूर अशा एकुण नऊ विभागातून ३०६ खेळाडू, १८ संघव्यवस्थापक, २० तांत्रिक अधिकारी सहभागी झाले आहेत.  सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे यांनी केले तर उपस्थितांचे आभार राज्य क्रीडा मार्गदर्शक
श्री जयराज मुंढे, यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात