दोन हजारांची लाच घेताना उदगीरचा तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
उदगीर:तहसील कार्यालयात कार्यरत असलेले तलाठी उमेश प्रकाश तोडकरी यांनी दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.थोडक्यात माहिती अशी की तक्रारदार यांच्या काकूचे हणमंतवाडी देवर्जन ता उदगीर येथील गट नंबर १०१ मधील शेती पाझर तलावासाठी संपादित शेतजमीनीच्या मावेजाची रक्कम खात्यावर जमा केल्याचा मोबदला म्हणून व पुढील अधिकचा मावेजा मिळणेकरिता अपिलाची फाईल त्रुटी न काढता पाठवण्यासाठी मदत व मार्गदर्शन करतो म्हणून दोन पंचासमक्ष तुम्हाला काय द्यायचे ते द्या,असे म्हणून तक्रारीत ठरलेली लाचेची मागणी केली.लाचेची रक्कम देण्यासाठी तक्रारदार हे आलोसे यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटले असता त्यांनी पंचासमक्ष २ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना उमेश प्रकाश तोडकरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले,ही कारवाई डॉ राजकुमार शिंदे पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो नांदेड,रमेशकुमार स्वामी अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित रेजितवाड पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन लातूर,भास्कर पुल्ली पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो लातूर यांच्या पथकाने केली आहे. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
0 Comments