राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार प्राप्त श्री.संग्राम पवार यांचा राठोड हॉस्पिटल येथे सत्कार
उदगीर:एन एम न्युजचे लातूर जिल्हा प्रतिनिधी तथा उदगीर व देवणी तालुका पब्लिक एपचे तालुका प्रतिनिधी तथा साप्ताहिक विक्रांत पेपरचे मुख्य संपादक संग्राम पवार यांना 24 डिसेंबर रोजी नांदेड येथे राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,पत्रकार संग्राम पवार यांना राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल देगलूर रोड उदगीर येथील राठोड हॉस्पिटलच्या वतीने डॉ गजेंद्र राठोड यांच्या हस्ते शाल पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी डॉ गजेंद्र राठोड यांचा मित्रपरिवार उपस्थित होता.
0 Comments