अवलकोंडा येथे घरात घुसून लोखंडी रॉडने केली मारहाण,सहा जणांवर गुन्हे दाखल
उदगीर:तालुक्यातील अवलकोंडा येथे घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की अवलकोंडा येथे आरोपितांनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या घरात घुसून मारहाण करण्यात आली.फिर्यादीस तू शेतात का जातोस असे म्हणून मागील भांडणाची कुरापत काढून फिर्यादीस काठीने,कोयत्याने,लोखंडी रॉडने मारून पाय फ्याक्चर करून गंभीर जखमी केले,व भांडण सोडवणाऱ्या इसमास डोक्यात काठीने मारून जखमी केले,व शिवीगाळ करून यापुढे फिर्यादीस तू शेतात गेलास तर तुला जीवे ठार मारू अशी धमकी दिली, दिनकर गोविंदराव बोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी विष्णुकांत निशिकांत गुंडरे, देविदास निशिकांत गुंडरे,मयूर विष्णुकांत गुंडरे,तुळशीदास निशिकांत गुंडरे,मनोज तुळशीदास गुंडरे,तनुजा विष्णुकांत गुंडरे यांच्यावर गुरंन ७०३/२३ कलम ३२६,४५२,१४३,१४७,१४८,१४९,३२३,५०४,५०६,भादवी प्रमाणे २६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक श्रीमंगल हे करीत आहेत.
0 Comments