Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषदेच्या मैदानावर २ डिसेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा

जिल्हा परिषदेच्या मैदानावर २ डिसेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा

उदगीर:क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर यांचे संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धांचे आयोजन दिनांक ०२ ते ०५ डिसेंबर २०२३ या कालावधीत तालुका क्रीडा संकुल मेन रोड उदगीर येथील (जि.प.प्रशाला मैदान) ता.उदगीर जि. लातूर येथे होत आहे.सदर राज्यस्तरीय स्पर्धेकरीता महाराष्ट्रातील १. मुंबई, २. पुणे, ३. नाशिक, ४.नागपूर, ५.अमरावती, ६. छत्रपती संभाजी नगर, ७. कोल्हापूर,८. क्रीडा प्रबोधिनी पुणे,९. लातूर अशा एकुण ९ विभागातून १७ वर्षाआतील मुले १६२ व मुली१४४ असे एकुण ३०६, खेळाडू आणि १८ क्रीडा मार्गदर्शक / संघ व्यवस्थापक सहभागी होत आहेत.तसेच राष्ट्रीय संघाच्या निवड चाचणी करीता प्रत्येक विभागामधून ५ खेळाडू निवड चाचणी करीता सहभागी होत आहेत.
या स्पर्धेमधून निवड करण्यात आलेल्या मुलांचा संघ अंदमान येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. आणि मुलींचा संघ बिहार येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेतील सहभागी १८ संघ आणि राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड चाचणी करीता प्रत्येक विभागातून ५ खेळाडू दिनांक ०२ ते ०५ डिसेंबर २०२३ या कालावधीत उदगीर शहरात वास्तव्यास आहेत. सर्व खेळाडूंची निवासाची व्यवस्था उदगीर शहरातील जयहिंद पब्लीक स्कुल, उदगीर येथे मुले व श्री. शिवाजी महाविद्यालयाचे वस्तीगृह येथे मुलींची निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे.राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन दिनांक ०३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता उद्घाटन संपन्न होणार आहे अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी लकडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Post a Comment

0 Comments

जाहिरात