Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामीण पोलिसांचा अवैध दारूवर धाडसत्र सुरूच,तालुक्यात तीन ठिकाणी छापे

ग्रामीण पोलिसांचा अवैध दारूवर धाडसत्र सुरूच,तालुक्यात तीन ठिकाणी छापे

उदगीर:तालुक्यात अवैध देशी दारू व गावठी हातभट्टीची विक्री करणाऱ्यावर ग्रामीण पोलिसांनी छापे टाकून पुन्हा एकदा कारवाई करून तीन गुन्हे नोंदवले आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उदगीर शहरातील बनशेळकी रोड परिसर,भाकसखेडा परिसर व नागलगाव परिसरात दारूची विनापरवाना चोरटी विक्री होत असल्याची माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप पांडुरंग भागवत व ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या सूचनेनुसार ग्रामीण पोलिसांच्या पथकाने बनशेळकी रोड परिसर,भाकसखेडा,व नागलगाव या परिसरात अवैध दारूची विनापरवाना चोरटी विक्री करणाऱ्यावर छापे टाकून 8 हजार रुपयांची देशी व गावठी हातभट्टी दारू उदगीर ग्रामीण पोलिसांनी जप्त करून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांवर कलम 65 (ड) ई महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत 6 डिसेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ही कारवाई ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस.बनसोडे, पोलीस नाईक गजानन नरसिंग जगताप, जुल्फिकार रसूल लष्करे,यांनी केली या आठवड्यातील ही दुसरी कारवाई असल्याने या कारवाईमुळे ग्रामीण भागात अवैध हातभट्टी दारू विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.तिन्ही गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल धुळशेट्टे,पोलीस नाईक केंद्रे,पोलीस हेडकॉन्स्टेबल भिसे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात