Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

लातूर जिल्ह्यासाठी 2024 मधील तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर*

*लातूर जिल्ह्यासाठी 2024 मधील तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर*

लातूर दि. 2 : जिल्ह्यासाठी 2024 मधील तीन स्थानिक सुट्ट्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी 27 डिसेंबर 2023 रोजीच्या अधिसूचनेनुसार जाहीर केल्या आहेत. यानुसार 11 जानेवारी 2024 रोजी दर्शवेळा अमावस्या, 11 सप्टेंबर 2024 रोजी ज्येष्ठा गौरीपूजन आणि 30 डिसेंबर 2024 रोजी दर्शवेळा अमावस्या निमित्त जिल्ह्यात स्थानिक सुट्टी राहणार आहे.
जिल्ह्यातील उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेतील कार्यालये, केंद्रीय कार्यालये, केंद्रीय प्रशासनातील कार्यालये व बँकेच्या कक्षातील कार्यालये वगळता लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेच्या कक्षेतील कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, जिल्ह्यातील कोषागारे, महामंडळाची कार्यालये व इतर सर्व खाजगी शैक्षणिक संस्था यांना या तिन्ही सुट्ट्या लागू राहतील.

****

Post a Comment

0 Comments

जाहिरात