सत्यनारायणाची पूजा करायला गेले,अन चोरट्याने घर फोडले
उदगीर:शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दैठणा येथे चोरट्याने घर फोडून दहा हजार रुपये किंमतीची एलईडी टीव्ही चोरून नेल्याची घटना घडली याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की.दैठणा येथील प्रमोद बाजीराव सांगवे हे दूध विक्रीचा व्यवसाय करतात दूध विक्री करून लातूर येथे सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी गेले असता त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरात भिंतीवर लावलेली दहा हजार रुपयांची सनसुई कंपनीची रंगीत एलईडी टीव्ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे अशी तक्रार प्रमोद बाजीराव सांगवे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून अज्ञात चोरट्यावर गुरंन 12/24 कलम 454,457,380 भादवी प्रमाणे 2 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बनसोडे हे करीत आहेत.
0 Comments