मोटरसायकल चोरास शहर पोलिसांनी लोहारा येथून केली अटक
उदगीर:शहरातील लातूर अर्बन बँक मोंढा रोड उदगीर येथून ३१ डिसेंबर रोजी मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना घडली होती.या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी मिथुन अभिमन्यू नरहरे यांची एम.एच.२४ एस २२७९ क्रमांकाची मोटरसायकल मोंढा रोड येथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली असी तक्रार उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिल्यावरून अज्ञात चोरट्यावर गुरंन ६/२४ कलम ३७९ भादवी प्रमाणे १ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर पोलिसांनी सदरील गुन्ह्याचा बारकाईने तपास केला असता मोटरसायकल चोरीतील आरोपी सुरेश मोहन बिरादार यांना लोहारा येथून २ जानेवारी रोजी रात्री उदगीर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मोटरसायकल चोरल्याची कबुली आरोपीने दिली असून ३ जानेवारी रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जयराम पुटेवाड हे करीत आहेत.
0 Comments