चोंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
उदगीर:तालुक्यातील चोंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.मुलींना शिक्षणाची दारे खुली करून देणारी मुलींसाठी पुण्यातील भिडेवावाड्यात पहिली शाळा सुरू करून मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारी भारतातील पहिली महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला शाळेत सहावी वर्गात शिकणारी विद्यार्थी कु.श्रद्धा ज्ञानोबा जावरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री राजकुमार रामचंद्र मोरखंडे,व शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments