उदगीर शहर पोलीस ठाणे येथे रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न.
उदगिर शहर पोलिस स्टेशन येथे रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करण सोनकवडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक पार पडली यावेळी उदगीर शहरातील विविध ठिकाणी रमजान महिन्याच्या निमित्ताने येणाऱ्या अडीअडचणीवर समस्यांवर चर्चा करण्यात आली गजबजलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यात येईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक करन सोनकवडे यांनी दिले. बैठकीत मौलाना हबीबुर रहमान यांना दोन मिनिटाचे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीला मौलाना आजीजूल रहमान, मौलाना रफीउद्दिन फारुकी, मौलाना महीउद्दीन, मौलाना हाफिज युसूफ ,काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष मंजूर खा पठाण ,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद जानी, संपादक इरफान शेख ,नितीन एकुरकेकर, फैयाज डांगे, इमरोज हाश्मी ,शेख इलियास ,मंजूर कुरेशी, सद्दाम बागवान, युसुफ बागवान ,सिद्दिकी मुनीर ,इब्राहिम देवर्जनकर, इत्यादी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन पोलीस उपनिरीक्षक गजानन काळे यांनी केले तर आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत कुदळे यांनी केले यावेळी महेश मुसळे, निखिल बुट्टे यांनी परिश्रम घेतले.


0 Comments