निवडणूक पूर्व तयारी,आचारसंहितेचे पालन करा,उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या कर्मचाऱ्यांना सूचना
उदगीर:निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालण करण्यासाठी नियुक्त पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षणात दिले,
आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने २३७ अजा. उदगीर मतदारसंघाअंतर्गत fst,sst,vst, vvt,खर्च पथक व निवडणूकीच्या अनुषंगाने कार्यप्रणाली अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक इतर अन्य आवश्यक पथक गठीत करुन कर्मचारी अधिकारी यांच्या नेमणुका करण्यात आल्या असुन त्या सर्व पथकाची पुर्व तयारीच्या अनुषंगाने एक आढावा बैठक या पुर्वीच घेण्यात अली.
१२ मार्च रोज मंगळवारी ११ वाजता पथकातील नियुक्त अधिकारी / कर्मचारी यांची उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे तथा मतदार नोंदणी अधिकारी उदगीर व तहसीलदार राम बोरगावकर तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी उदगीर यांच्या उपस्थीतीत व पोलीस निरीक्षक उदगीर ग्रामीण, शहर ,व जळकोट यांच्या उपस्थीतीमध्ये संबंधीत पथकातील नेमणूक केलेले सर्व कर्मचारी यांची आदर्श अचार संहितेचे व आयोगाने दिलेले सुचना व मार्गदर्शनानुसार त्याचे तंतोतंत पालन करण्यासाठी उदगीर उपविभागातील सर्व नियुक्त कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित केले होते.सदर आयोजीत प्रशिक्षणामध्ये आदर्श आचार संहितेचे नियम व आयोगाच्या सुचना व प्रत्येक प्रथकाचे कार्य व त्यांची कार्यप्रणाली आणि त्यातील त्यांची जबाबदारी या बाबत सदर प्रशिक्षणात कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले व सर्व संबंधीतांना सदर प्रशिक्षणामध्ये आदर्श आचारसहितेचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी संबंधीत कर्मचारी अधिकारी यांना सक्त सुचना दिल्या.


0 Comments