शिक्षक तुकाराम तलवाडे आदर्श गुरु गौरव पुरस्काराने सन्मानित
येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक तुकाराम मनोहरराव तलवाडे कमालनगरकर यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ( प्रा.वि.) लातूरच्या वतीने रविवारी दयानंद कॉलेज सभागृहात जिल्हास्तरीय आदर्श गुरु गौरव पुरस्काराने शिक्षक आ. विक्रम काळे व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा गुणवंतांचा गौरव करण्याचा हा उपक्रम होता. यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष मच्छिंद्र गुरमे, राज्य कार्यवाह पुरूषोत्तम काळे, कार्यवाह अंगद चामवाड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उल्का गुडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शिक्षकातून तलवाडे यांचे अभिनंदन केले जात आहे.


0 Comments