Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

आश्चर्यम.... अखंड चार वर्ष फिरले "थाटात अन् नेटात."अन् अचानक गेले., तुतारीच्या "गटात"..

आश्चर्यम.... अखंड चार वर्ष फिरले "थाटात अन्  नेटात.",
अन् अचानक गेले., तुतारीच्या "गटात".
.
उदगीर: नागलगावं येथील माजी सरपंच नामदार संजय बनसोडे यांचे निष्ठावंत समजले जाणारे कट्टर समर्थक आणि कार्यकर्ते राजीव वाघे हे,नामदार संजय बनसोडे यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठेंगा दाखवून , शरद पवार यांच्या गटात प्रवेश केल्याच्या बातमीने जनतेच्या व्यासपीठावर मोठ्या चर्चेला उधाण आलेले आहे,. विकासपुरुष, विकासरत्न, आणि  उदगीरच्या विकासाचे [आभाशी ]  शिल्पकार  असे नामाभिधान घेऊन 4 वर्ष त्यांच्या नावाचा जप माळणारे, तसेच सोशल मीडियावर सदैव त्यांच्या कार्याची थोरवी गाणारे राजीव वाघे हे अचानकपणे शरद पवार यांच्या गटात का गेले या प्रश्नार्थक नजरेसह नागलगाव सह पंचक्रोशीतील नागरिकांच्या चर्चेला पेव फुटलेले आहे,
बनसोडे यांचे अतिशय कट्टर समर्थक असलेले, व ते मंत्री झाल्यापासून आपल्या गावाचा काहीतरी विकास होईल, विकास करू, आपल्या गावाला पुढे घेऊन जाऊ या अपेक्षेने, अपेक्षित भावनेने तब्बल  4 वर्ष, 24 तास सोबत वावरणारे राजीव वाघे यांना , कदाचित बनसोडे यांच्याकडून आपल्या गावाचा काही विकास होणार नाही , आपणाला केवळ आश्वासनांचे गाजर दाखवून झुलवत ठेवण्यात आले हे लक्षात आल्याने, ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपले जनमत दाखविण्यासाठी ते अखेर शरद पवार यांच्या गटात गेले का असाही सूर जनतेतून  ऐकावयास  येत आहे..  तळमळीने झटणारे असे निष्ठावंत कार्यकर्ते जर आज बनसोडे यांना सोडून जात असतील तर नामदार संजय बनसोडे यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, कट्टर कार्यकर्ते जर दुसऱ्या पक्षात प्रवेश करून आपलं जनमत दाखविणार असतील तर निश्चितच उद्याची निवडणूक येणारा काळच ठरवेल
  इतके मात्र नक्कीच,
 राजकारणात खरा विकास हा आभाशी विकासापेक्षा, खुप ते अशाश्वत आणि पूर्णतः ढोंगी असते असाच मनातला भाव तोंडी न आणता लोकं आप आपसात कुजबुजताना हे ही दिसून येत आहे.माजी सरपंच राजीव वाघे यांनी अखेर नामदार संजय बनसोडे यांना धक्का देत रामराम ठोकला.

Post a Comment

0 Comments

जाहिरात