गोवंशाना डांबून वाहतूक करणारा टेम्पो ठाकरे चौकात पोलिसांनी पकडला,दोघांवर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
उदगीर शहरातील रिंग रोड हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक येथे १२ बैल घेऊन जाणारा आयशर टेम्पो पोलिसांनी १६ मार्च रोज शनिवारी सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास पकडला असून दोघा आरोपीवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की केए ३८,८६४१ या क्रमांकाच्या टेम्पो मध्ये १२ गोवंश जातीचे जनावरे त्यांना त्रास होईल अशा पध्दतीने कमी जागेत डांबून त्यांना क्रूर व निर्दयतेची वागणूक देऊन त्यांना वाजविरित्या हालचाल करता येणार नाही अशा रीतीने डांबून त्याची वाहतूक करीत होते, अशी फिर्याद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश गुरनाथ कांबळे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी तुकाराम उरप्पा कैकाडी चालक वय ४५ वर्ष राहणार जानवड ता.जि.बिदर यशप्पा पुंडलिक हलगे किनर वय ५५ वर्ष राहणार ददापुर ता. जि. बिदर यांच्यावर १७ मार्च रोज रविवारी रात्री एक वाजता गुरंन १५०/२४ कलम ११ (१) (ड) प्राणी कायदा सहकलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक भिसे हे करीत आहेत.सदरील गोवंशाना उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात सोडण्यात आले आहे.
0 Comments