नळगीरच्या सरपंच व पती सदस्य यांचे सदस्यत्व अपात्र म्हणुन घोषीत .
जिल्हाधिकाऱ्यांनी केले सदस्यत्व रद्द ! दोघांचे पदे रिक्त -
उदगीर : तालुक्यातील नळगीर येथील महिला सरपंच यांचे सरपंच पद व सदस्यत्व तसेच त्यांचे पती सुद्धा ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्र तसेच दोघांचेही पदे रिक्त झाल्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी काढले आहेत .
याबाबत थोडक्यात माहिती अशी की उदगीर तालुक्यातील नळगीर येथील सरपंच अंजुषा पद्माकर उगिले व त्यांचे पती पद्माकर मनोहर उगले यांनी ग्रामपंचायत नळगिरच्या वतीने केल्या जाणाऱ्या कामांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याची व इतर मुद्ये टाकुन जयप्रकाश नामदेव कापसे व मनोज अशोकराव शेटकार रा . नळगीर यांनी जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे १३ जानेवारी २०२३ रोजी तक्रार केली होती . या बाबत जिल्हाधिकारी यांनी गटविकास अधिकारी उदगीर यांना तक्रारी मध्ये नमूद केलेल्या मुद्दे निहाय चौकशी करण्याबाबत कळवले होते . कृष्णाई कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स व कृष्णाई खडी केंद्र चे मालक यांचे व सरपंच व त्यांच्या पतीचे नातलग असल्याचे आढळून आले तसेच वर्ष २१ -२२ आणि २२ - २३ साली झालेल्या कामाचे शासकीय कपात , कामगार विमा , आयकर , जीएस टी , गौण खनीज ची रक्कम संबंधीत यंत्रणेला भरणा केल्याचे दस्त चौकशी दरम्यान सरपंच व ग्राम विस्तार अधिकारी यांनी न दर्शवीता कर्तव्यात कसुर केल्याचे निदर्शनास आले आहे . गटविकास अधिकारी यांचा अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष सुनावणी घेऊन व उपलब्ध पुराव्यानुसार सरपंच व त्यांच्या पतीने ग्रामपंचायतच्या कामकाजामध्ये अप्रत्यक्षरित्या लाभ उचलले असल्याने निदर्शनास आल्यावरून जिल्हाधिकारी यांनी १ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (१) (ग), १६ (२ ) नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून तक्रारदार यांचा अर्ज अंशतः मंजूर करत सरपंच अंजुषा पद्माकर उगले यांना ग्रामपंचायत नळगीर येथील सरपंच तथा सदस्य पदावरून व पती पद्माकर मनोहर उगले यांना सदस्य पदावरून अपात्र ठरवले व त्यांचे दोघांचे पद रिक्त झाल्याचे घोषित केले आहे .
0 Comments