आठ तोळे सोन्याचे बिस्कीट असलेली हँड पर्स अज्ञाताने पळविले,शहर पोलिसांत गुन्हा दाखल.
उदगीर शहरातील उद्योग भवन येथे महिलेचे आठ तोळे सोन्याचे बिस्कीट अज्ञाताने चोरून नेल्याची घटना १८ एप्रिल रोजी तीन वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी महिला सीमा नरेंद्र परगे वय ४७ वर्ष राहणार रेड्डी कॉलनी देगलूर रोड उदगीर ही महिला १८ एप्रिल रोजी उद्योग भवन येथे काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेली असता त्याच्या हँड पर्समध्ये ठेवलेले १० हजार रोख व आठ तोळे सोन्याचे बिस्कीट असा एकूण ५ लाख २६ हजार ७६१ हजार रुपयांचा मुद्देमाल उद्योग भवन येथील पालकी स्टोअर्स ते नॅशनल बॅगल स्टोअर्स दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे,सीमा नरेंद्र परगे यांच्या फिर्यादीवरुन उदगीर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुरंन ११३/२४ कलम ३७९ आयपीसी प्रमाणे २१ एप्रिल रोज रविवारी रात्री उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पुट्टेवाड हे करीत आहेत.
0 Comments