Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

*कु. नेहा हिरेमठ या विद्यार्थिनीचा नराधमाने केलेल्या हत्येच्या विरोधात ABVP चे "निषेध मार्च"*

*कु. नेहा हिरेमठ या विद्यार्थिनीचा नराधमाने केलेल्या हत्येच्या विरोधात ABVP चे "निषेध मार्च"*

उदगीर;अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, उदगीर शाखेच्या वतीने कर्नाटक राज्यातील हुबळी जिल्ह्यातील मौजे सौदत्ती येथील कु. नेहा निरंजन हिरेमठ या विद्यार्थिनीचा फैयाज या नराधमाने केलेल्या हत्येच्या विरोधात नगर परिषद, उदगीर येथून छ. शिवाजी महाराज चौक येथे "निषेध मार्च" काढून मा. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 
        कर्नाटक राज्यातील हुबळी जिल्ह्यातील मौजे सौदत्ती येथील 23 वर्षीय कु. नेहा निरंजन हिरेमठ हि विद्यार्थीनी बीव्हीबी कॉलेज हुबळी मध्ये एमसीए सेमिस्टर परीक्षेसाठी कॉलेजमध्ये गेली होती. नेहा आणि फयाज बीसीएच्या काळात मित्र होते. फयाजने अनेकवेळा लग्नाची मागणी केल्यावर तिने मैत्री तोडली. एम.बी.ए. ची परिक्षा देउन घरी येत असताना एकटीला रस्त्यात गाठून फयाजने तिच्यावर चाकूने 9 वार केल्याने नेहाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, उदगीर शाखेच्या वतीने "निषेध मार्च काढण्यात आला व मा. तहसीलदार यांना ही केस फास्ट्रॅक्ट कोर्टात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावे असे निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय जनता यूवा मोर्चा, जंगम समाज उदगीर, श्रीराम प्रतिष्ठान यांनी या मार्च ला पाठिंबा दिला. यावेळी लातूर विभाग संयोजक विशाल स्वामी, शहर सहमंत्री सुमित लाल, अरविंद गुंडीले, आदित्य पाटील, नितीश शिरसे, सागर पटणे, आरती स्वामी, दिव्या राठोड व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

जाहिरात