Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

बसवेश्वर चौक येथे पाठलाग करून सत्तूर व कत्तीने मारहाण,तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बसवेश्वर चौक येथे पाठलाग करून सत्तूर व कत्तीने मारहाण,तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

उदगीर:शहरातील रेल्वे स्टेशन येथील बसवेश्वर चौकात एकास पाठलाग करून कत्तीने मारहाण केल्याची घटना २० जून रोज गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली आहे याप्रकरणी तिघांवर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रेल्वे मध्ये झालेल्या बाचाबाचीच्या कारणावरून आरोपींने संगनमत करून फिर्यादीस शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने मारहाण केली,व रेल्वे स्टेशन बसवेश्वर चौक येथून फिर्यादीचा पाठलाग करून कॉर्नर चौक येथे येवून कत्तीने व सत्तूरने मारून गंभीर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली,अक्रम हेदर शेख वय २५ वर्ष राहणार जळकोट नाका उदगीर यांच्या फिर्यादीवरुन उदगीर शहर पोलीस ठाण्यात आरोपी असिफ रउफ बागवान, सोहेल पाशा शेख,अश्फाक शेख यांच्यावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुरंन १६९/२४ कलम ३२६,३२४,३२३,५०४,५०६,३४ भादवी सह कलम ४,२५ भारतीय हत्त्यार कायदा सह १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार २० जून रोज गुरुवारी सात वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास पोलीस हेडकन्स्टेबल चव्हाण हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात