कमिशनचे पैसे मागून गंभीर मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा,उदगीर सत्र न्यायालयाचा निकाल
उदगीर:अनुसूचित जातीच्या व्यक्तीस ऑटोचे हप्ते भरण्यासाठी मुदत वाढवून देण्यासाठी कमिशनचे पैसे मागून गंभीर मारहाण केल्याप्रकरणी आरोपींस उदगीर सत्र न्यायालयाने जन्म ठेपेची शिक्षा व दहा हजार रुपयांचा दंड २२ जून रोज शनिवारी ठोठावला आहे,थोडक्यात माहिती अशी की,आरोपी मजर युनूस शेख यांनी उदगीर बस्थानकासमोर २७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अनुसूचित जातीच्या फिर्यादीला आरोपीने फोनवर तू वही ठेर जा,तू ऑटो के कमिशन के पाच हजार रुपये क्यू नहीं दे रहा है ? तू अगर पैसे नहीं दिया तो तुझे जानसे मार दुंगा, अशी धमकी फोनवर दिली,व त्याने बस्थानकावर थांबलेल्या फिर्यादीस पाहून जातीवाचक शिवीगाळ करून हातातील वेळूच्या काठीने उजव्या हातावर मारून हात मोडला व कानावर चाकूने वार करून जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीस गंभीर दुखापत केली,फिर्यादीच्या तक्रारीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुरंन ३५१/२०२१ कलम ३२६,३२४,५०४,५०६,५०७ भादवी सह कलम ३(१) (जी) (आर) (एस) ३(२) (५-अ) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता, सदरील गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे व उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांच्याकडे देण्यात आला होता, सदरील गुन्ह्याचा संपूर्ण तपास करून दोषारोपपत्र उदगीर सत्र न्यायालयात दाखल केले होते, सदरील खटल्याची सुनावणी २२ जून रोज शनिवारी पिठासन अधिकारी विशेष सत्र न्यायधीश पी.डी सुभेदार यांच्या दालनात पार पडली, सुनावणी दरम्यान एकूण १० साक्षीदारांची साक्ष नोंदवली.तसेच जखमींवर उपचार केलेले वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष नोंदवण्यात अली,सर्व साक्षीदारांनी सरकार पक्षाला सहकार्य केल्याने व सरकारी वकील यांनी कागदपत्राच्या आधारे युक्तिवाद सादर केल्याने सत्र न्यायधीश पी.डी.सुभेदार यांनी आरोपी मजर युनूस शेख यांना कलम ३२६,३२४ भादवी व कलम ३(२)(५) अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३२६ भादवी अंतर्गत पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावला दंड नाही भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा व अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार जन्म ठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे दंड नाही भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाचा ऐतिहासिक निर्णय दिला,सरकार पक्षाच्या वतीने ऍड एस.आय.बिराजदार यांनी काम पाहिले तर सहाय्यक सरकारी वकील एस.एस.गिरवलकर,जि.सी.सय्यद, पोलीस हेडकन्स्टेबल सिकंदर शेख,एल.एम.बिरादार,ऍड एस. व्ही.देशपांडे यांनी सहकार्य केले.
0 Comments