Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर शहरात विविध ठिकाणी १ लाख ६ हजार २६१ युनिटची विज चोरी,शहर पोलिसांत ६ लोकांवर गुन्हा दाखल

उदगीर शहरात विविध ठिकाणी १ लाख ६ हजार २६१ युनिटची विज चोरी,शहर पोलिसांत ६ लोकांवर गुन्हा दाखल

एकूण १६ लाख ९ हजार ८४० रुपयांची वीज चोरी

उदगीर/प्रतिनिधी
उदगीर:शहरातील बिदर रोड, माळेवाडी रोड,भागात वीज वापरदाराने २२ ऑगस्ट २०२३,९ ऑक्टोबर २०२३,२० डिसेंबर २०२३ व २९ जानेवारी २०२४ रोजी एकूण १ लाख ६ हजार २६१ युनिटची वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला, याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात १२ जून रोज बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास सहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बिदर रोड,माळेवाडी रोड भागात वीज वापरदार आरोपीने वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला,आरोपीने  १ लाख ६ हजार २६१ युनिटची वीज चोरी करून महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीची १६ लाख ९ हजार ८४० रुपयांची वीज चोरी केली व तडजोड अंती ५ लाख ३५ हजार रुपयांचे नुकसान केले,आरोपींना वीज चोरी व तडजोड रक्कमेचे बिल दिले असता त्यांनी ते बिल दिलेल्या मुदतीत भरणा न केल्यामुळे तुकाराम गोरोबा वडवळे सहायक अभियंता महावितरण शाखा गंजगोलाई लातूर यांच्या फिर्यादीवरून आरोपी शमशोद्दीन रहीमोद्दीन शेख,किसन यशवंतराव बिरादार, दत्तात्रय दिगंबर बिरादार, राहुल मधुकर तेलंगे,रशिदा बशीरसाब शेख व शफिर बशीरसाब शेख  यांच्यावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुरंन १५६,१५७,१५८,१५९,१६०/२४ कलम १३५ भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार १२ जून रोज बुधवारी रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत,

Post a Comment

0 Comments

जाहिरात