पूर्णा हैद्राबाद रेल्वेत एक अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळला,रुग्णालयात उपचार सुरू
उदगीर: पूर्णा हैदराबाद एक्सप्रेस मध्ये २० जुलै रोज शनिवारी कोच नंबर पाच मध्ये एक ३५ वर्षीय पुरुष व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती वैभव कुमार यांनी रेल्वे पोलिसांना दिली,माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी पूर्णा हैद्राबाद रेल्वे बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या अनोळखी व्यक्तीस उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले उदगीर येथील रुग्णालयात उपचार केल्यानंतर,डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवले असून लातूर येथे अनोळखी व्यक्तीवर उपचार सुरू असल्याची माहिती रेल्वे पोलीस डफडे यांनी दिली आहे,सदरील व्यक्तीस कोणी ओळखत असल्यास 7385399239 या मोबाईल नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे पोलीस डफडे यांनी केले आहे.
0 Comments