करडखेल येथील खाजगी शाळेतून पोषण आहाराची चोरी..
उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील करडखेल येथील मिलिंद विद्यालय येथून ५ हजार ३८० रुपयांचा शालेय पोषण आहार चोरुन घेऊन गेले. याप्रकरणी मंगळवारी (९ जुलै) दुपारी एकच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.६ ते ८ जुलै दरम्यान करडखेल येथील मिलिंद विद्यालयात अज्ञात आरोपीने शाळेतील पत्र्याचे स्टोअरमध्ये ठेवलेले मसुरदाळ १७ कि.ग्रॅ.प्रती कि.ग्रॅ.१२० रुपये प्रमाणे २ हजार ४० रुपये, मुगदाळ १७ कि.ग्रॅ.प्रती कि.ग्रॅ ८० रुपये प्रमाणे १ हजार ३६० रुपये व १८ तेलाचे पाँकेट प्रती पाँकेट ११९ रुपये प्रमाणे १ हजार ९८० रुपये असा एकूण ५ हजार ३८० रुपयेचा पोषण आहार कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून घेवून गेले आहे.
याप्रकरणी मुख्याध्यापक संजीवकुमार मल्लिकार्जुन बिरादार मिलींद विद्यालय, करडखेल (रा. जानापूर ता. उदगीर हा. मु. शिक्षक काँलनी, उदगीर) यांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं.३७८/२०२४ कलम ३३४(१) भारतीय न्याय सहिंता २०२३ नुसार अज्ञात चोराविरुध्द चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल एस.डी.भिसे हे करीत आहेत.
0 Comments