जुगाराच्या मंदिरात अर्जुन गौडा पुजारी,मटके बहाद्दरांच्या दर्शनासाठी रांगा
उदगीर शहरात दिवसेंदिवस मटका जुगारामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले, उदागीर बाबाच्या पवित्र नगरीत गौडाने अनेक मटक्याचे मंदिर उभारले लाखों लोकांना पैशाचा आमिष दाखवून मटका जुगाराच्या लालसेत ओढून घेतले असून मटक्याच्या मंदिरात अर्जुन गौडा,एकनाथ टेकाळे,अजय दामुवाले,अकबर शेख,ममदापुरे पुजारी होवून बसले आहेत पुजाऱ्याच्या दर्शनासाठी मटकेबाज बहाद्दरांच्या रांगा लागल्याचे दररोज पहायला मिळत आहे.भाजी मार्केट,उमा चौक,चौबारा,हनुमान कट्टा,खडकाळ गल्ली,बसवेश्वर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक, मोंढा रोड,कल्पना चौक,बिदर नाका,श्रीनगर कॉलनी,गोपाळ बार समोर,एसटी स्थानक समोर,भोसले कॉम्प्लेक्स या ठिकाणी जुगारांचे मंदिर असून या मंदिरात दररोज मटके बाज भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या दिसून येते आहेत,या मटक्यामुळे अनेकांचे घर उध्वस्त होत असल्याचे निवेदन मनसेचे जिल्हा अध्यक्ष संजय राठोड यांनी उपजिल्हाधिकारी यांना दिले आहे.
0 Comments