मटका या जुगार व्यवसायाना अधिकृत परवाने द्या. संजय राठोड
उदगीर:- गेल्या काही महिन्यापासून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे साहेबांच्या काळात लातूर जिल्ह्यासह उदगीर तालुक्यातील बंद झालेले मटका हा अवैध जुगार पुन्हा जोमाने उदगीर शहरासह संपूर्ण तालुक्यात सुरू झालेला आहे असे आढळते. मटका या जुगार व्यवसायाने संपूर्ण तालुक्यात धुमाकूळ घातला असून कायद्याने हा व्यवसाय बेकादेशीर असूनही दिवसाढवळ्या राजरोसपणे खेळला जात असून असून दर दिवसात लाखो रुपयांची उलाढाल व्यवसायातून होते या जुगाराने आनेकाचे संसार रस्त्यावर आणले असून उदगीर परिसरातील शांतता अभंग करण्याचे काम या जुगाराने होत आहे आज पर्यंत उदगीर तालुक्याची ओळख संतांची भूमी म्हणून शिक्षणाचे माहेरघर म्हणून होती पण आता ती अवैध्य धंद्याचे माहेरघर अशी होत आहे हे सर्व अवैध धंदे राजरोसपणे सुरू असतानाही नेमके पोलीस प्रशासन काय करत आहे असा प्रश्न उपस्थित होतो कारण उदगीर शहराच्या गर्दीने गजबजलेल्या उमा चौक जय जवान चौक आर्य समाज बिदर नाका बिदर गेटवरील उड्डाणपुलाखाली नाईक चौक भोसले संकुल निडेबन बन शेळकी रोड सह हाळीहंडरगुळी येथे अनेकदा कायदेशीर कार्यवाही होऊन देखील हा व्यवसाय अद्याप सुरू असून आणि हाळी सह उदगीर परिसरात 30 ते 40 मटका जुगार चालणाऱ्या बुक्क्या दिनदिकत चालविल्या जात आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशाची उलाढाल होऊनही यातून एकही रुपया कराच्या स्वरूपात शासनास मिळत नसून संपूर्ण पैसा हा कळ्या पैशाचा स्वरूपात अवैध चालकांच्या खिशात जातो त्यामुळे सर्व सामान्याचे गोरगरिबाचे संसार रस्त्यावर आणणाऱ्या मटका हा जुगार तात्काळ बंद करून जुगार व्यवसायिकावर कायदेशीर कारवाई करावी आणि प्रशासनास या अवैध धंद्यावर लगाम घालता येत नसेल तर मटका या जुगार व्यवसायास कायदेशीर मान्यता देऊन अधिकृत परवाने देण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पोलीस उप अधीक्षक कार्यालय उदगीर उपजिल्हाधिकारी कार्यालय उदगीर सह तालुक्यातील सर्व कार्यालयासमोर मटक्याच्या बुक्या चालू करून तीव्र निषेधार्मक आंदोलन हाती घेईल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना दिले यावेळी जिल्हाध्यक्ष संजय राठोड शहराध्यक्ष संतोष भोपळे शहर सचिव लखनपुरी तालुका अध्यक्ष शेतकरी सेना अजय भंडे, विनोद चव्हाण, भानुदास राजेकर केदार पुराणिक,अजय शिंदे, नामदेव राठोड आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments