Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

देवणी पोलीस स्टेशन हद्दीत एका गावात दुसरी वर्गात शिकणाऱ्या एका चिमुकलीवर नराधामाचा अत्याचार,देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

देवणी पोलीस स्टेशन हद्दीत एका गावात दुसरी वर्गात शिकणाऱ्या एका चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार,देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

देवणी/प्रतिनिधी
देवणी:पोलीस स्टेशन हद्दीत एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे ८ वर्षीय मुलींवर नराधमांने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार ६ जुलै रोज शनिवारी तीन वाजेच्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की देवणी पोलीस स्टेशन हद्दीत एका गावात दुसरी वर्गात शिक्षण घेत असलेल्या ८ वर्षीय अल्पवयीन मुलींवर गावातीलच आरोपी बाळू ऊर्फ श्रीकांत अप्पाराव डब्बे वय ४० वर्ष या नराधमांने मुलीस घरी बोलावून बलात्कार केला.सदर पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.निलंगा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर व देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डोके यांनी ६ जुलै रोजी रात्री उशिरा पर्यंत रुग्णालयात तळ ठोकून वैद्यकीय तपासणी करून घेतली.या घटनेतील आरोपींला पोलीस ताब्यात घेतले असून पीडित मुलींच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बाळू उर्फ श्रीकांत अप्पाराव डब्बे यांच्यावर देवणी पोलीस ठाण्यात गुरंन २३२/२४ क ६५ (२) भारतीय न्याय संहिता २०२३ सह कलम ४,६ बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार ७ जुलै रोज रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक डोके हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात