Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

दुर्गादेवी तांडा येथे बापाला केस मागे घ्यायला लाव म्हणून मुलाचे दगडाने डोके फोडले; पाच जणांविरुद्ध गुन्हा..

दुर्गादेवी तांडा येथे बापाला केस मागे घ्यायला लाव म्हणून मुलाचे दगडाने डोके फोडले; पाच जणांविरुद्ध गुन्हा..

उदगीर : प्रतिनिधी 
उदगीर तालुक्यातील दुर्गादेवी तांडा येथे बापाला केस मागे घ्यायला लाव म्हणून मुलाचे दगडाने मारून डोके फोडून गंभीर जखमी केले. याप्रकरणी मंगळवारी रात्री उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.११ सप्टेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास आरोपीचे घरासमोर दुर्गादेवी तांडा (ता. उदगीर) येथे आरोपीनी गैर कायद्याची मंडळी जमवून यातील फिर्यादीस तुझ्या वडीलांनी माझ्यावर कोर्टात दाखल केलेली केस मागे घ्यायला लाव म्हणून शिवीगाळ केली व संदीप बाबु राठोड याने दगडाने फिर्यादीच्या डोक्यात मारून डोके फोडले व बाबु भोजा राठोड, देविदास बाबु राठोड,भाउराव बाबु राठोड यांनी फिर्यादीस खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तुझ्या वडीलांनी माझ्यावर कोर्टात दाखल केलेली केस मागे घेतली नाही तर तुला, तुझ्या वडीलांना व आईला जिवे ठार मारतो म्हणून धमकी दिली.
याप्रकरणी लक्ष्मण उध्दव राठोड (वय २२ वर्षे रा. दुर्गादेवी तांडा ता. उदगीर) याच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात बाबु भोजा राठोड,देविदास बाबु राठोड, संदीप बाबु राठोड, भाउराव बाबु राठोड,सुनिल गोविंद जाधव सर्व (रा. दुर्गादेवी तांडा ता. उदगीर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाॅस्टेबल व्हि.ए.शिरसे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात