टाकळी येथे झाड तोडत असताना पोल कोसळला युवक ठार,पाच जणांवर देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
देवणी तालुक्यातील टाकळी येथे झाड तोडताना विद्युत पोल कोसळून एका १८ वर्षीय मुलांचा मृत्यू झाल्या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की देवणी तालुक्यातील टाकळी येथे १७ सप्टेंबर रोज मंगळवारी दुपारी साडे बारा वाजता आरोपीने हाजी मुल्ला यांच्या घराच्या पाठी मागील झाड तोडत असताना मयत तरुणांने झाड का तोडला कोणाच्या तरी अंगावर झाड पडून मरतील असे म्हंटले असता आरोपी हाजी मुल्ला व हबीब मुल्ला हे मयतास म्हणाले की काय व्हायच ते होऊ दे कोण काय मरणा आम्हाला काय करायच असे म्हणून शिवीगाळ केली.असे सांगूनही कोणती काळजी न घेता हायगायीने झाड तोडल्याने तेथे हजर असलेल्या लोकांचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असताना त्यांनी तोडत असलेला झाड विद्युत तारेवर पडल्याने विद्युत तारेचा खांब अल्ताफ हामजू नाईकवाडे वय १८ वर्ष या तरुणांच्या अंगावर कोसळले यात तरुण गंभीर जखमी होऊन मरण पावला.याप्रकरणी इस्माईल हामजू नाईकवाडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सादेव धोंडीराम माने,माधव धोंडीराम माने,प्रमोद धोंडीराम माने,राहणार आळवाई ता भालकी जि बिदर, हबीब मुल्ला,हाजी मुल्ला राहणार टाकळी ता देवणी या पाच आरोपींवर तरुणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात गुरंन २९२/२४ कलम १०५,३५२,भारतीय न्याय संहिता नुसार १८ सप्टेंबर रोज बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गौंड हे करीत आहेत.
0 Comments