उदगीर शहरात लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलींसोबत जबरी शारीरिक संबंध,पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
उदगीर शहरात एका १६ वर्षीय मुलीला लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात १९ सप्टेंबर रोज गुरुवारी पहाटे साडे चार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की उदगीर शहरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपी अमीर जाकीर शेख याने जानेवारी २०२४ ते ऑगस्ट २०२४ पर्यंत लग्नाचे अमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवला व लग्न करण्यास नकार देऊन चार महिन्यापूर्वी दुसरे लग्न केले व ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुला जीवे मारू अशी धमकी दिली.फिर्यादी ही अल्पवयीन असल्याचे माहित असताना सुध्दा वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवला याप्रकरणी पिडीत मुलींच्या फिर्यादीवरून आरोपी अमीर जाकीर शेख वय २० वर्ष यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरंन ५१४/२४ कलम ६४ (२),(१),(M) ३५१ (२) भारतीय न्याय संहिता ४,५ (२),६,८ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देवकत्ते हे करीत आहेत.
0 Comments