उदगिरात चोरीच्या ४ दुचाकी जप्त ४ दुचाकी चोरांना ठोकल्या बेड्या
उदगीर : प्रतिनिधी
उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी व गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्तिक कारवाईत १८ सप्टेंबर रोज बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास शहरातील बनशेळकी रोड भागात चोरीतील १ लाख ३० हजार रुपयांची चार दुचाकीसह चार दुचाकी चोरांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. अशी माहिती उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सांयकाळी उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे हददीतील बनशेळकी रिंगरोड टी पॉईंट परिसरात पेट्रोलींग करीत असतांना प्राप्त सीसीटीव्ही फुटेज मधील आरोपी नवाज मुजीब आत्तार रा. बनशेळकी रोड उदगीर हा त्याचे साथिदार, शिवाजी बाबुराव लिंबाळे वय २२ वर्ष, रा. बनशेळकी रोड उदगीर, विक्रम विठल कांबळे उर्फ नेत्या वय १८ वर्ष रा. संतकबीरनगर उदगीर,निलेश नंदु सकट वय १९ वर्ष, रा. संतकबीरनगर बनशेळकीरोड उदगीर यांच्या सोबत चोरीचे मोटर सायकल ताब्यात बाळगुण बनशेळकी रोड टी पॉइंटवर थांबुन असल्याची माहीती मिळाल्या प्रमाणे उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पुजारी व डीबी पथकातील अधिकारी व अंमलदार गेले असता. प्राप्त सीसीटीव्ही फुटेज मधील मोटर सायकल चोर नवाज आतार व त्याचे वरिल इतर तिन साथिदार यांचे ताब्यात चोरीच्या वेगवेगळ्या कंपणीच्या ४ मोटर सायकली मिळुन आल्याने रात्री साडेसातच्या सुमारास त्यांना ताब्यात घेवुन विचारपुस केले असता त्यांनी सर्वानी मिळून गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.
◆ सदरील गुन्ह्याची केली कबुली
● पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे कलम ३७९ भादवी प्रमाणे दोन गुन्हे दाखल आहेत तर
पोलीस ठाणे देवणी गुरन १८७/२४ कलम ३७९ भादवी नुसार गुन्हा दाखल आहे,
सदरील आरोपीनी त्यांचे ताब्यातील इतर दोन मोटर सायकली हया पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण व पोलीस ठाणे देवणी हद्यीतुन चोरल्याचे कबुल केले असुन अधिक तपास व कसून चौकशी चालु आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी दिली.
सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंढे,अपर पोलीस अधिक्षक अजय देवरे, उप विभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख,व पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी उदगीर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुनिल अशोक भिसे, पोलीस हेडकाॅस्टेबल राम बनसोडे, राजेंद्र घोरपडे, संतोष शिंदे, नामदेव चेवले, चालक राजकुमार देवडे यांनी कामगीरी पार पाडली.
0 Comments