Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

*कुमठा,अहमदपूर येथे रविवारी मोफत सर्व रोगनिदान व औषधोपचार तथा नेत्ररोग-मोतीबिंदू व ब्लड शुगर तपासणी शिबिर*

*कुमठा,अहमदपूर येथे रविवारी मोफत सर्व रोगनिदान व औषधोपचार तथा नेत्ररोग-मोतीबिंदू व ब्लड शुगर तपासणी शिबिर*

उदगीर/प्रतिनिधी 
उदगीर:बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ,अहमदपूर द्वारा संचलित धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर यांच्या वतीने जिल्हा परिषद प्रशाला,कुमठा,ता:-अहमदपूर येथे रविवार,दिनांक:-२२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक १०.३० ते दुपारी ०४.३० या दरम्यान मोफत सर्व रोगनिदान व औषधोपचार तथा नि:शुल्क मोतीबिंदू व रक्त शर्करा(ब्लड शुगर) तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शक माजी मंत्री बाळासाहेब जाधव; अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय-कार्यसम्राट आमदार बाबासाहेब पाटील; सेवानिवृत्त मुख्याध्यापक-माजी चेअरमन,वि.का.से.सो.कुमठा येथील तुकाराम मरवाळे; बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ,अहमदपूर चे सहसचिव बळीराम भिंगोले,कोषाध्यक्ष अंकुशराव कानवटे,सदस्य कुमुदिनी जाधव यांच्यासह राजकीय,सामाजिक,आरोग्य-वैद्यकीय,शैक्षणिक,सहकार,ईत्यादी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिबिरामध्ये विविध चिकित्सा पद्धतीचे तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टर्स वातविकार,संधिवात,आमवात,आम्लपित्त,मधुमेह,त्वचा विकार,कान-नाक-घसा चे आजार,हृदयरोग,पोटाचे विकार,लहान बालकांचे आजार व स्त्रीयांचे विकार-मासिकपाळी,स्तन व गर्भाशयाचे आजार,मानसिक आजार,कर्करोग,अस्थिरोग,यकृताचे विकार,वंध्यत्व व लैंगिक समस्या इत्यादी आजारांच्या रुग्णांवर आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार व मार्गदर्शन करणार आहेत.
शिबिरामध्ये नोंदणी केलेल्या महिलांची मोफत(नि:शुल्क)कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया  नि:शुल्क(मोफत)केली जाईल आणि तसेच प्रसुती(बाळंतपण) व गर्भाशयासंबंधीत विकारांची शस्त्रक्रिया तथा अपेंडिक्स,हर्निया,हायड्रोसिल,मुळव्याध व भगंदर या शस्त्रक्रिया अल्प(५०% सवलत)दरात धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज,श्रीकृष्ण मंदिरासमोर,देगलूर रोड,उदगीर येथे केली जाणार आहे.
*शिबिरामध्ये लॉयन्स नेत्र रुग्णालय,उदगीर यांच्या सहकार्याने मोफत नेत्ररोग तपासणी करून मोतीबिंदू आजाराचे निदान झालेल्या व नोंदणी केलेल्या व्यक्तींवर अल्प दरात औषधोपचार व शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येणार आहेत.*
तरी या मोफत शिबिराचा रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ,अहमदपूर चे संचालक मंडळ तथा धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर चे प्राचार्य,सर्व डॉक्टर्स व शिक्षकेत्तर-रुग्णालयीन कर्मचारी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात