खाजगी प्राथमिक मुख्याध्यापक उदगीर तालुका कार्यकारणी जाहीर
उदगीर:तालुक्यातील खाजगी प्राथमिक मुख्याध्यापक संघ महाराष्ट्र राज्य उदगीर शाखा तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली.डॉ सय्यद मेमोरियल हायस्कूल येथे खाजगी मुख्याध्यापक संघाची बैठक घेण्यात आली या बैठकीत
तालुका अध्यक्ष कानवटे राजकुमार,उपाध्यक्ष पवार संग्राम, हाश्मी सय्यद,अरविंद ढोबळे, सचिव दायमी नशिमोद्दिन,सहसचिव हाश्मी मुजाहिद,हरकरे राजकुमार, कोषाध्यक्ष मुंडकर पांडुरंग, प्रसिद्धीप्रमुख स्वामी शिवयोगी, संघटक येरणाळे राम, सदस्य हुरूसनाळे गया, नामाजी हणमंत,सय्यद कदिर,यांची नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.यावेळी खाजगी प्राथमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अंकुशे सोमनाथ, उपाध्यक्ष दाडगे दादाराव,सचिव हाश्मी सय्यद शफीक, सहसचिव भोसले सत्यवान, कोषाध्यक्ष जिवने शिवशंकर उपस्थित होते. उदगीर तालुका कार्यकारणी निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक संघाच्या वतीने सर्व तालुका कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला आणि पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी तालुक्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते.
0 Comments