Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू ,मयताचा डावा हात बेपत्ता

रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू ,मयताचा डावा हात बेपत्ता

लातूर रोड रेल्वे स्टेशन येथे १४ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजेच्या पूर्वी कोण्यातरी धावत्या रेल्वेतून खाली सापडून एक जण मरण पावल्याची घटना घडली आहे. महादेव बळीराम यादव वय ३८ वर्ष राहणार मांग वडगांव  ता. केज जि.बीड असे मरण पावलेल्या व्यक्तीचे नावं आहे.मयत व्यक्तीचा डावा हात बेपत्ता असून मयताचा हात रेल्वेत अडकून गेला असावा किंवा जंगली प्राण्यांने ओढून नेला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.त्याचा डावा हात घटनाथळावर मिळून आला नाही. मयत इसमाचा हात आढळून आल्यास रेल्वे पोलीस  परळी,दुरक्षेत्र उदगीर येथील पोलीस हावलदार डफडे यांच्या ७३८५३९९२३९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे पोलीस हवालदार डफडे यांनी १८ ऑक्टोबर रोज शुक्रवारी रात्री १० वाजता केले आहे.सदरील घटनेची रेल्वे पोलीस स्टेशन परळी वैजनाथ येथे अकस्मात मृत्यू १५/२४ कलम १९४ भारतीय न्याय संहिता नुसार नोंद करण्यात आली आहे अधिक तपास परळी पोलीस हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात