जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी केली ईव्हीएम स्ट्रॉंग रूमची पाहणी
उदगीर:विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्व क्षेत्रीय अधिकारी व नोडल अधिकारी यांच्या कामकाजाविषयी आढावा घेतला.तसेच उदगीर तालुक्यात लावण्यात आलेल्या सर्व चेक पोस्ट,तसेच ईव्हीएम स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणी कक्षाला भेट देऊन पाहणी करून प्रशासनास सूचना केल्या,याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, उदगीरचे उपविभागीय तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत शिंदे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत कदम, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राम बोरगावकर,जळकोटचे तहसीलदार लांडगे,बिदर जिल्ह्यातील सीमालगतच्या तालुक्याचे तहसीलदार पोलीस अधिकारी व सर्व क्षेत्रीय अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते.
0 Comments