तादलापूर चेकपोस्टवर २ लाखाची रोकड जप्त..
सबळ पुरावे दिले नसल्यामुळे रोकड जप्त करण्यात आली..
उदगीर तालुक्यातील तादलापूर चेकपोस्टवर विधानसभा निवडणूक आचारसंहिता पार्श्वभूमीवर स्थायी निगराणी पथकाने किनवट ते देवणीकडे जाणाऱ्या एका कारमधून २ लाख रुपयांची रोकड बुधवारी (२३ ऑक्टोबर) दुपारी दोनच्या सुमारास पकडली. संबंधित लोकांनी रक्कम संदर्भात पुरावा दिल्या नसल्याने ती रक्कम जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती आचारसंहिता प्रमुख तथा गटविकास अधिकारी उदगीर प्रविण सुरडकर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तादलापूर चेक पोस्टवर स्थायी निगराणी पथक क्रमांक १ हे वाहनांची तपासणी करत असताना शिवणी (इस्लापूर) ता.किनवट जि.नांदेड येथून देवणी येथे निघालेल्या होंडा सीटी कार क्र. एम.एच. ४३ बी सी २२५७ याची तपासणी करताना पथकाला २ लाख रुपयांची रोकड मिळुन आली. यावेळी कारमध्ये कारमध्ये किरण परमेश्वर कांडगे रा.दहेगाव ता.किनवट जि. नांदेड यांच्यासह चौघेजण कारमध्ये होते.
पथकातील टी.व्ही.सावरे, व्हि.एम.साळुंखे, व्हि.एम.पाटील, पोलीस कर्मचारी पी.वाय.माने यांच्यासह आदींनी आपले कर्तव्य बजावले.
0 Comments