विकासाची सर्वाधिक कामे माझ्या 10 वर्षाच्या कार्यकाळात - सुधाकर भालेराव
उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करताना लोकाभिमुख विकासाची सर्वाधिक कामे सन 2009 ते 2019 या माझ्या दहा वर्षाच्या कार्यकाळात उदगीर विधानसभा मतदारसंघात झाल्याचे प्रतिपादन माजी आमदार तथा महाविकास आघाडीचे उदगीर विधानसभेचे अधिकृत उमेदवार सुधाकर भालेराव यांनी केले आहे. महाविकास आघाडीच्या जनसंवाद यात्रेत जळकोट तालुक्यातील मौजे पाटोदा (बु) येथे ते बोलत होते.
महाविकास आघाडीचे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुधाकर संग्राम भालेराव यांनी 10 वर्ष उदगीर विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. महाविकास आघाडीच्या जनसंवाद यात्रेत पाटोदा (बु) येथे बोलताना भालेराव म्हणाले की, उदगीर - जळकोट तालुक्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम मी केले आहे. उदगीरला पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी धरणातून तब्बल 60 किलोमीटर अंतरावरून उदगीर शहराला पाणीपुरवठा करणारी महत्त्वाकांक्षी योजना मी माझ्या काळात राबवली. त्यासाठीचा भरीव निधीही शासनाकडून मंजूर करून घेतला. आज उदगीर शहराची सन 2051 पर्यंतची पाण्याची समस्या पूर्णतः मिटली आहे. शिवाय माळहिप्परगा विद्युत उपकेंद्रातून उदगीर- जळकोट तालुक्यांना मुबलक विजेचा पुरवठा केला जात आहे.
सन 2019 पासून पाच वर्षाच्या काळात मी मंजूर करून आणलेल्या विकास कामांचे केवळ भूमिपूजन करण्याचे काम निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान आमदाराने केले आहे. उदगीर-जळकोट तालुक्यातून जाणारे दोन्हीही राष्ट्रीय महामार्ग माझ्या कार्यकाळात मंजूर झाले आहेत. त्यामुळे उदगीर,जळकोट तालुक्यातील नागरिकांची वाहतुक सुलभ व सुरक्षित झाली आहे. परंतु विरोधकांकडून येथील मतदारांची दिशाभूल करण्याचे काम सध्या सुरू आहे. मागील पाच वर्षात उदगीर विधानसभा मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. भ्रष्टाचाराने हैदोस घातला आहे. त्यामुळे उदगीर जळकोट तालुक्यातील जनता खोट्या आश्वासनांना बळी न पडता महाविकास आघाडीला मतदान करून राज्यात परिवर्तन घडवेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
- चौकट :
उदगीरच्या गद्दार आमदाराला आता मतदानातून धडा शिकवा - संजय शेटे
सन 2019 मध्ये शरद पवार यांच्यामुळेच उदगीर विधानसभेतील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान केले. निवडून दिल्यानंतर पहिल्यांदाच आमदार झालेल्या इथल्या आमदाराला शरद पवारांनी मंत्री केले. परंतु इथल्या आमदाराने शरद पवार यांच्याशी गद्दारी केली आहे. आता सुधाकर भालेराव यांना शरद पवार यांनी उदगीर विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उदगीर मधल्या गद्दार आमदाराला धडा शिकवण्यासाठी सुधाकर भालेराव यांना पुन्हा आमदार करून इथल्या गद्दार आमदाराला धडा शिकवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लातूरचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी पाटोदा (बु) येथे जनसंवाद यात्रेत बोलताना
केले आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, जिल्हा सचिव नारायण नागरगोजे, जिल्हा सरचिटणीस धनाजी कोयले, जळकोट विधानसभा अध्यक्ष धोंडीराम पाटील, जळकोटचे तालुकाध्यक्ष नेमीचंद पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सचिन केंद्रे, जळकोट तालुका उपाध्यक्ष कोंडीबा सोमवंशी, राजाभाऊ केंद्रे, मल्लिकार्जुन करडखेलकर, हमीद शेख, पाटोदा (बु) सरपंच सुनील नामवाड, लहुकुमार जाधव, बालाजी उगिले (पोलीस पाटील), सतीश बडगिरे, शंकर माडे, तंटामुक्ती अध्यक्ष वेंकटराव नगरगोजे, बालाजी अंदुरे सावकार, वरून अंदुरे, अशोकराव गुट्टे, प्रमोद दाडगे, नजीरसाहब शेख, सलीम बागवान, रामेश्वर पाटील, दिलीप सोनकांबळे, विलास राठोड, गफूरसाब मुल्ला, शंकर पवार, देविदास पवार, गोपीनाथ पवार, अब्बास तांबोळी, किशनराव चमकुरे, गोविंद कांबळे, अंगद गुट्टे यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
......
0 Comments